भजनी मालिका
← भजनांकडे परत

न वर्णवे जन्ममरणाचें दु:ख । दावीं आतां मुख पांडुरंगा

na varnave janmamaranachen du:kha | davin atan mukh panduranga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
न वर्णवे जन्ममरणाचें दु:ख । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥१॥ कुरळिया केश भाळीं शोभे टिळक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥२॥ भोवया व्यंकटा शोभती सुरेख । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥३॥ कमलाकार नेत्र सुंदर नासीक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥४॥ कर्णींचीं कुंडलें न वर्णवे हाटक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥५॥ आधार आरक्त दंत इंदुहूनि अधिक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥६॥ विष्णुदास नामा तुझेंचि बाळक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥७॥