भजनी मालिका
← भजनांकडे परत

न लगे करा खटपट । धरा पंढरीची वाट । विठ्ठलीं बोभाट । अठ्ठहास्य करावा

na lage kara khatapat | dhara pandharichi vat | viththalin bobhat | aththahasya karava

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न लगे करा खटपट । धरा पंढरीची वाट । विठ्ठलीं बोभाट । अठ्ठहास्य करावा ॥१॥ धरा संतांचा समागम । मुखीं उच्चारा रे नाम । जाते क्रोध आणि काम । दिगंतरीं पळोनीं ॥२॥ आशा मनशांचे काज । सहज दुर होतें निज । घडतां सहज । विठ्ठलचेअं दरुशन ॥३॥ एका जनार्दनीं मन । राखा पायीं तें नेमून । काया वाचा शरण तया पदीं होईजे ॥१॥