भजनी मालिका

भजने

तिसरे अवतारीं नामा उध्दव जन्मला । करुनी कृष्ण दास्यत्व मान्य पैं जाहला ॥१॥ ज्ञान वैराग्य भक्ति कृष्ण सांगे तयासी । तेणें चुकविलें शापबंधासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तिहीं त्रिभुवना ज्याची सात्त वाहे । तो चोरी करिताहे घरोघरीं ॥१॥ न कळे न कळे लाघव तयाचें । ब्रह्मादीक साचे वेडावती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तिहीं त्रिभुवनीं पातकी पीडिले । ते मुक्त जाहले पंढरीसी ॥१॥ पाहतां सांवळा अवघीयां विश्रांती । दरुशनें शांतीं पातकीयां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तिहीं त्रिभुवनीं सत्ता जयाची । तो गोपाळाचि उच्छिष्टे खाय ॥१॥ खाउनी उच्छिष्ट तृप्तमय होय । यज्ञाकडे न पाहे वांकुडे तोंडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तिहीं लोकां जें दुर्लभ । होतें निक्षेपिलें स्वयंभ ॥१॥ वेदराय सनकादिकीं । पोटाळूनियां एकाएकीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तीन अक्षरी जप पंढरी म्हणे वाचा । कोआटी या जन्मांचा शीण जाय ॥१॥ युगायुगीं महात्म्य व्यासें कथियेलें । कलियुगें केलें सोपें पुंडलिकें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तीन अक्षरें निवृत्ति । जो जप करी अहोरात्रीं । तया सायुज्यता मुक्ती । ब्रह्मस्थिती सर्वकाळ ॥१॥ चार अक्षरें ज्ञानदेव । जो जप करी धरील भाव । तया ब्रह्मपदीं ठाव । ऐसें शिवादिदेव बोलिले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तीर देखोनियां यमुनेचें जळ । कांठीं च कोल्हाळ करिताती ॥१॥ कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासि ओढी भय मागें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

तीरा आणिला श्रीकृष्ण । हरिखे यमुना झाली पुर्ण । चढ़े स्वानंदजीवन । चरण वंदनार्थ ॥१॥ वसुदेव म्हणे कटकटा । यमुना रोधिली वाटा । कृष्ण असतां निकटा । मोहं मार्ग न दिसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तीर्थ कानडें देव कानडे । क्षेत्र कानडें पंढरीये ॥१॥ विठ्ठल कानडे भक्त हे कानेड । पुंडलीकें उघडें उभे केलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा । संत ते अधमा माणसाऐसे ॥१॥ वांजेच्या मैथुनापरी गेलें वांयां । बांडेल्याचें जायां जालें पीक ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥१॥ माता विठ्ठल पिता विठ्ठल । बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तीर्थयात्रेप्रति बोळविला नामा । आले निजधामा देवरावो ॥१॥ चरण प्रक्षाळाया रुक्मादेवी आली । श्रीमुख न्हाहाळी भरोनी दृष्टी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव