भजनी मालिका
← भजनांकडे परत

तीर देखोनियां यमुनेचें जळ । कांठीं च कोल्हाळ करिताती

tir dekhoniyan yamunechen jal | kanthin cha kolhal karitati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तीर देखोनियां यमुनेचें जळ । कांठीं च कोल्हाळ करिताती ॥१॥ कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासि ओढी भय मागें ॥२॥ मागें सरे माय पाउला पाउलीं । आपलाच घाली धाकें अंग ॥३॥ अंग राखोनियां माय खेद करी । अंतरीचें हरी जाणवलें ॥४॥ जाणवलें मग देवें दिली बुडी । तुका म्हणे कुडी भावना हे ॥५॥