भजनी मालिका
← भजनांकडे परत

तिहीं लोकां जें दुर्लभ । होतें निक्षेपिलें स्वयंभ

tihin lokan jen durlabh | hoten nikshepilen svayambh

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तिहीं लोकां जें दुर्लभ । होतें निक्षेपिलें स्वयंभ ॥१॥ वेदराय सनकादिकीं । पोटाळूनियां एकाएकीं ॥२॥ तेंचि मुळींचे भांडवल । नांव पावलें विठ्ठल ॥३॥ निळा म्हणे विटेवरीं । ठेविलें पुंडलिकें तें व्दारीं ॥४॥