भजनी मालिका
← भजनांकडे परत

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल

tirtha viththal kshetra viththal | dev viththal devapuja viththal

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥१॥ माता विठ्ठल पिता विठ्ठल । बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥ गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल । निधान विठ्ठल निर्मतर विठ्ठल ॥३॥ नामा म्हणे मज विठ्ठल सांपडला । ह्मणोनी कळिकाळां पाड नाहीं ॥४॥