भजनी मालिका

भजने

जें देवा दुर्लभ स्थान । मनुष्यासी तें सोपें जाण ॥१॥ या ब्रह्माडांमाझारीं । सृष्टी जाणावी पंढरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जे दोष घडले न फिटे करितां कांहीं । सरते तुझ्या पायीं जाले तैसे ॥१॥ माझा कां हो करूं नये अंगीकार । जालेती निष्ठुर पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जें पदींनिरुपण तेंचि हृदयीं ध्यान । तेथें सहजीं स्थिर राहे मन । कीर्तनासी तोषोनि कळिकाळ तुष्टला । समाधीसी समाधान रे ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

जे म्हणविती न्हावियाचे वंशीं । तेणें पाळावें स्वधर्मासी ॥१॥ येर अवघे बटकीचे । नव्हे न्हावियाचे वंशीचे ॥२॥

रचनाकार: संत सेना

जें येथें होतें तें तेथें नाहीं । ठाईंच्या ठाईं हरपलें ॥१॥ घरींच्या घरीं जाली चोरी । आपणावरी आळु आला ॥२॥

जें वेदांसी नातुडे श्रुतींसी सांकडें । ते उभे वांडेंकांडें पंढरीये ॥१॥ न माये चराचरीं योगियांच्या ध्याना । तया म्हणती कान्हा नंदाचा जो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जें सुख संतसज्जनाचे पायीं । तें सुख नाहीं आणिके ठायी ॥१॥ तुकितां या सुखाचेनी तुके । पैं वैकुंठ जाले फिकें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जेऊनियां स्वस्थ उठिले परिपूर्ण । केलें आचमन वैष्णवांनीं ॥१॥ वैकुंठींचा प्रसाद पावेल निवाडे । गोंदा महादा विडे वांटिताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जेऊनियां हातीं देवें दिधली वाटी । आला उठाउठी नामा घरा ॥१॥ गोणाई म्हणे रे ऐक नामदेवा । नैवेद्य आणावा माझे हातीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जेजे कांहीं मज होईल वासना । तेते नारायणा व्हावें तुम्हीं ॥१॥ काय भाव एक निवडूं निराळा । जाणसी तूं कळा अंतरींचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम