भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेणें आणियेली क्षिती । रसातळींहुनी वरती

jenen aniyeli kshiti | rasatalinhuni varati

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जेणें आणियेली क्षिती । रसातळींहुनी वरती ॥१॥ तो हा उभा कृपावंत । ठेवुनी कटांवरीं हात ॥२॥ ज्याचे नाभीकमळींहून । जन्म पावे चतुरानन ॥३॥ निळा म्हणे कमळा नारी । ज्याचे चरणी वास करीं ॥४॥