भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें सुख ऐकतां मन तें निवांत

jen sukh aikatan man ten nivant

रचनाकार: संत बंका · अभंग
जें सुख ऐकतां मन तें निवांत । तेंचि मूर्तिमंत विटेवरी ॥१॥ साजिरें गोजिरें श्रीमुख चांगले । कर मिरवले कटावरी ॥२॥ समचरण दोनी शोभती पाउले । ध्यान मिरवले पंढरीये ॥३॥ आनंदी आनंद सुखाचा सुखराशी । घाली चरणासी वंका मिठी ॥४॥