भजनी मालिका

भजने

गोणाई म्हणे नाम्या वचन माझें ऐक पोटींचें बाळक म्हणोनि सांगे ।।१।। महिमेचा संसार सांडोनि आपुला संग त्वां धरिला निःसंगाचा ॥२॥

रचनाकार: संत गोणाई

गोणाई राजाई दोषी सासू सुना दामा नामा बाप लेक।।१॥ नारा विठा गाँदा महादा चव पु जन्मले पवित्र त्याचे वंशीं ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

गोदातीरीं उत्सव करिती जगजेठी । चांगदेवासाठीं समारंभ ॥१॥ निवृत्ति मुक्ताबाई संगें पंढरिनाथ । आले मंडपांत समुदायेंसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोधनें घेउनी गोपाळ आले । छायेसी बैसले कळंबाचिये ॥१॥ आतां म्हणे मांडा खेळ । गोमटी हे वेळ सांपडली ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

गोधनें चाराया जातो शारंगपाणी । मार्गीं भेटली राधिका गौळणी । कृष्ण दान मागे निरी आसडोनी । तंव ती देखिली यशोदा जननी ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

गोपाळ गौळणी शोभती त्या मुर्ती । तें सुख परिक्षिती संतजन ॥१॥ ऐसें अपरंपार भक्त ते असती । स्वयेंचि श्रीपती दावितसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोपाळ दुबळा मी लस्करि तुझा ॥ काम क्रोध ब अहंकार तेजी ॥ वीकून खादले ॥ काये अंत पाहातोसि माझा ॥१॥

रचनाकार: संत महंमद

गोपाळ म्हणती कान्हया आमुचीं उमाणीं । सांगसी तरि चरणीं ठेंवूं माथा ॥१॥ यावरीं श्रीहरि बोले मधुराक्षरीं । पुसा रे झडकरी विलंब नका ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

गोपाळ म्हणती कान्हया कृष्नातें । आजी यमुनेचे जळ वर्जा कां जी ॥१॥ हरी म्हणे तयातें तेथें बाऊ आला । म्हणोनि तया स्थळा नवजावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोपाळ म्हणती कान्हा । सांभाळीं आपुल्या गोधळा । पळतां सैराट धांवती राना । गेल्या ठेल्या त्या तुम्हीं जाणां ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

गोपाळ म्हणती कान्होबा या रे कांहीं मागों । आपुलाले आम्ही जीवीची तया आवडी सांगों । एक म्हणती उगे रे उगे रे उगे रे मागेंचि लागों । निजों नका कोणी घरीं रे आजि अवघेचि जागों ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

गोपाळपुरीं काला गोपाळ करिती । तेथील लाभा देव लाळ घोटिती ॥१॥ ऐसा आनंड गे माय तया पंढरपुरी । धन्य भक्त देवंचे वारकरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ