भजनी मालिका

भजने

कृष्ण सर्वागीं सुंदर । लावण्य गुण रत्नाकर । सत्यभामा म्हणे हा वर । जन्मोजन्मीं पावावा ॥१॥ ऎसें विचारितां मनीं । तंव पातले नारदमुनी । चरणां लागली धांवोनी । वरासनीं बैसविलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कृष्ण सहाय पांडवासी । ते भोगिती नष्टचर्यासी । ते भोगिती नष्टचर्यासी । साह्य केलें हरिहरासी । प्रारब्ध कोणासी टळेना ॥१॥ ऐसी प्रार-ब्धाची ठेव । झाले भिक्षुक पांडव । राज्य घोडे भाग्य सर्व । सांडि-येला ठाव प्रारब्धें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी म्हणे ॥१॥ म्हणे कृष्णाविण कैसें तुम्हां गमे । वळि हा करमे वांयांविण ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कृष्णकथा सांग जेणें तुटे पांग । न लगें तुज-उद्वेग करणें कांहीं ॥१॥ समर्थ सोयरा राम हा निधान । जनीं जनार्दन एक ध्याईं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कृष्णनाम श्रेष्ठ गाती देव ऋषी । नाम अहर्निशीं गोपाळाचें ॥१॥ हरी हरी हरी तूंचि बा श्रीहरी । वसे चराचरी जनार्दन ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कृष्णबळिरामातें म्हणती । गोवळे तुम्हीं अर्भक जाती । मारिला म्हणोनी कुळवई हस्तीं । तेणेंचि स्फुंदेस्फुंदूं नका ॥१॥ बहुत दिवस खादलें लोंणी । चोरिये वोसिली दुधाणी । सिंतरुनियां भोगिल्या गौळणी । त्याचीही झाडती निघेल । ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कृष्णभक्तीविण तरला आहे कोण । द्यावा निवडून एक तरी ॥१॥ कार्य आणि कारण लटका हा शीण । वर्म न कळोन वांयां गेलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कृष्णमूर्ती होय गे काळी आली सोयं गे । प्राणाचाही प्राण पाहतां सुख सांगुं काय गे ॥१॥ तुळशी माळ गळां गे कस्तुरीचा टिळा गे । आर्धांगी रुक्मिणी विंझणे वरित गोपी बाळा गे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कृष्णराम लीला सवें त्या गोपाळां । जन्मासी सांवळा कैसा आला ॥१॥ विस्तार बोलाया बैस तूं अंतरा । करीं तूं पामरा कृपादान ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कृष्णरुपा वेधिल्या नारी । देखती अंतरी तेंचि रुप ॥१॥ गमनीं शयनीं आसनी भोजनीं । देखती जनीं वनीं दृष्टीपुढें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कृष्णा कैशी खेळूं लपंडाई । अनंत लोचन तुझे पाही । तेथें लपावें कवणे ठायीं । तुझें देखणे लागलें पाहीं ॥१॥ कान्होबा पाववी आपुल्या खुणा ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

कृष्णा पांच खासा उथळ दिसती । लाहानाल्या भिंती त्याजवरी ॥१॥ विस्तू घालिताती गवत आंथरती । बडबड करीती अवघेजण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कृष्णाचिया सुखें भुक नाहीं तहान । सदा समाधान सकळांचें ॥१॥ कळलें चि नाहीं झाले किती दिस । बाहेरिल वास विसरलीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कृष्णाचें कीर्तन नावडे ज्या नरा । जन्मोनि अघोर पडे नरकीं ॥१॥ कृष्णश्रवण नाइके जो कानीं । तयासि मेदिनीं ठाव कैंचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कृष्णांजनें जाले सोज्वळ लोचन । तेणें दिले वान निवडुनी ॥१॥ निरोपाच्या मापें करीं लडबड । त्याचें त्यानें गोड नारायणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कृष्णातें चैतन्य गौळिया गोपाळा । जिवींचा जि-व्हाळा कृष्ण एक ॥१॥ न गमेचि तया कृष्ण संगाविणें । कृष्णीं चरणीं मन सर्वकाळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कृष्णारुपीं भाळल्या गोपिका नारी । नित्य नवा कृष्ण जीवा आवडतो भारी । पवन वेगीं चालिल्या कालिंदीतीरीं । चिदानंद भावें भोगावा श्रीहरीं ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ