भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्णाचें कीर्तन नावडे ज्या नरा । जन्मोनि अघोर पडे नरकीं

krushnachen kirtan navade jya nara | janmoni aghor pade narakin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कृष्णाचें कीर्तन नावडे ज्या नरा । जन्मोनि अघोर पडे नरकीं ॥१॥ कृष्णश्रवण नाइके जो कानीं । तयासि मेदिनीं ठाव कैंचा ॥२॥ कृष्णविष्णुकथा नावडे पैं नित्य । तयासी पैं सत्य ग्रहबाधी ॥३॥ रामकृष्ण हरी न ध्याय जो मूर्ति । तया यम नेती अंतीं जाणा ॥४॥ नामा ह्मणे हे नर कलियुगीं उदंड । घरो-घरीं पाखांड करिताती ॥५॥