भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्णराम लीला सवें त्या गोपाळां । जन्मासी सांवळा कैसा आला

krushnaram lila saven tya gopalan | janmasi sanvala kaisa ala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कृष्णराम लीला सवें त्या गोपाळां । जन्मासी सांवळा कैसा आला ॥१॥ विस्तार बोलाया बैस तूं अंतरा । करीं तूं पामरा कृपादान ॥२॥ म्हणोनि विनवी पाया पैं निगुती । ऐकावें श्रींपाति नामा ह्मणे ॥३॥