भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्णांजनें जाले सोज्वळ लोचन । तेणें दिले वान निवडुनी

krushnanjanen jale sojval lochan | tenen dile van nivaduni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कृष्णांजनें जाले सोज्वळ लोचन । तेणें दिले वान निवडुनी ॥१॥ निरोपाच्या मापें करीं लडबड । त्याचें त्यानें गोड नारायणें ॥ध्रु.॥ भाग्यवंतांघरीं करितां विश्वासें । कार्य त्यासरिसें होईजेतें ॥२॥ तुका म्हणे पोट भरे बरे वोजा । निज ठाव निजा निजस्थानीं ॥३॥