भजनी मालिका

भजने

काळानें ग्रासिलें सावधान व्हा रे । सोडवण करा रे हरिनामें ॥१॥ आयुष्य सरलीया कोण पां सांगाती । पुढें हो फजिती यमदंड ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काळावरी घालूं तरि तो सरिसा । न पुरतां इच्छा दास कैसे ॥१॥ आतां नाहीं कांहीं उसिराचें काम । न खंडावें प्रेम नारायणा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काळिकाळावरी नाम । जाले जैसे मनोधर्म । वदतं पुरुषोत्तम । पुण्य जोडे असंख्य ॥१॥ वाचे सदा श्रीराम । तेणें पुरे सर्व काम । मोक्षामार्ग सुगम । नाम उच्चारणें जोडें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काळी घोंगडी हातीं काठी । लागला धेनुंचे पाठी ॥१॥ अरे हरी व्रज वांकुंडा कीं तुजसाठीं । बैसला यमुनेचे तटीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काळें खादला हा अवघा आकार । उत्पत्तीसंहारघडमोडी ॥१॥ बीज तो अंकुर आच्छादिला पोटीं । अनंता सेवटीं एकाचिया ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काळे गोरे एकापुढें एक । धांवताती बिदो बिदीं देख । अलक्ष लक्ष्या नये सम्यक । तो नंदनंदन त्रिभुवननायक गे माय ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

काळें ग्रासिलेंक सकळ । उरला जाऊं नेदी वेळ । घटिका आणि पळ । रामनाम स्मरे जना ॥१॥ अरे आलेती संसारा । कांहीं ती विचार करा । आयुष्याचा दोरा । तुटे तो न कळेची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काळें ना सांवळें गोरें नापिवळें । वर्ण व्यक्ति वेगळें विटेवरी ॥१॥ आनंद स्वानंद नित्य परमानंद । आनंदाचा कंद विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ