भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळे गोरे धनुर्वाडे । ते चालताती रामापुढें

kale gore dhanurvade | te chalatati ramapudhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काळे गोरे धनुर्वाडे । ते चालताती रामापुढें ॥१॥ राम निळिये गुढारी । कनक दंड चवरे वरी ॥२॥ चला चित्रकूटीं जाऊं । राम दशरथाचा पाहूं ॥३॥ अयोध्ये केला अवतारु । राम नामया दातारु ॥४॥