भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळाचे ही काळ । आम्ही विठोबाचे लडिवाळ

kalache hi kal | amhi vithobache ladival

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काळाचे ही काळ । आम्ही विठोबाचे लडिवाळ ॥१॥ करूं सत्ता सर्वां ठायी । वसों निकटवासें पायीं ॥ध्रु.॥ ऐसी कोणाची वैखरी । वदे आमुचे समोरी ॥२॥ तुका म्हणे बाण । हातीं हरीनाम तीक्षण ॥३॥