भजनी मालिका

भजने

एके घाई खेळतां न पडसी डाई । दुचाळ्याने ठकसील भाई रे । त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चौघांसी तरी धरीं सोई रे ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

एके दिनीं प्रातः काळीं । कृष्णें घेतलीसे आळी । देखोनियां उदय मेळीं । सुर्यबिंब ॥१॥ देई देई मज तें आई । रडत बैसला हो बाई । काय सांगो हो सई । या बाळातें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एके दिनीं भार्या भावें तें मानवी । भ्रतारा विनवी नम्रतेनें ॥१॥ तुमचा सोइरा आहे नारायण । अखंडित ध्यान करितां त्याचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एके दिनीं रत्नसिंहासनावरी । कैसा त्रिपुरारी शोभ-तसे ॥१॥ सांगों जातां चार्‍ही वाचा विसांवती । तेथें माझी मति काय सांगों ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एके दिवशी शारंगपाणी । खेळत असतां राजभुवनीं । तेव्हा देखिली नयनीं । गौळणी ते राधिका ॥१॥ मीस करुनी पाणीयाचें । राधा आली तेथें साचें । मुख पहावया कृष्णाचे । आवड मोठी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एके हातीं टाळ एके हातीं दिंडी । ह्मणे वाचा उदंडीं रामनाम ॥१॥ श्रीहरीसारिखा गोसांवी पैं चांगु । फेडिला पैं पांगु जन्मांतरींचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकेकाळीं मोठा आनंद पैं झाला । नभीं उगवला पूर्ण चंद्र ॥१॥ तेव्हां गोप आले विनविती गोपाळा । आतां जाऊं चला चोरीलागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव