भजनी मालिका
← भजनांकडे परत

एके दिनीं भार्या भावें तें मानवी । भ्रतारा विनवी नम्रतेनें

eke dinin bharya bhaven ten manavi | bhratara vinavi namratenen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एके दिनीं भार्या भावें तें मानवी । भ्रतारा विनवी नम्रतेनें ॥१॥ तुमचा सोइरा आहे नारायण । अखंडित ध्यान करितां त्याचें ॥२॥ तयाचिये भेटी जावें लवकरी । तो आहे कैबारी दीनालागीं ॥३॥ भेटतांचि नासे अज्ञान दरिद्र । सुखाच समुद्र पांडुरंग ॥४॥ नामा म्हणे देव भक्ता साहाकारी । सर्व सिद्धि घरीं वोळगती ॥५॥