भजनी मालिका

भजने

ऎका पुण्यपावन व्रताचें महिमान आचरतां जन दोष जाती ॥१॥ सर्वांमाजीं सार व्रत एकादशी । रुक्मांगद सूर्यवंशी करी नेमें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऎकोनियां पुत्राचें वचन । मातेनें वर्तमान कथियेलें ॥१॥ तेणें तया क्रोध भरलासे मनीं । दूतालागुनी तत्क्षणीं आज्ञा केली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक आधार खोंचुनी स्वाधिष्ठाना येती मणिपुरी घेताती झटे । चंद्रसुर्य कला म्हणती बारा सोळा पवनासी करिती उफराटे ।

रचनाकार: संत एकनाथ

एक एक मंत्र करिती अनुष्ठान । परि विठोबाचे चरण दुर्लभ ते ॥१॥ एक एक तीर्था करिती प्रदक्षिणा । परि विठोबाचे चरण दुर्लभ ते ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक एक मरती पहाती । दुजियासी भ्रांति कैशी बापा ॥१॥ अरे ग्रासिलें शरीर काळे देखा । परि तया मूर्खा न कळे कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक एक म्हणती सकळ लोक । पाहतां एका एक हारपलें ॥१॥ एकाविण एक गणीत नाहीं देख । तें नित्य वोळख निजें आत्मीया रे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक एक योनी कोटी कोटी फेरा । नरदेह थारा अवचटा ॥१॥ मांडिलासे खेळ मांडिलासे खेळ । मांडियेला खेळ नरदेहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक एकादशी होय पंढरीसी । सुकृताच्या रासी ब्रह्मा नेणे ॥१॥ चंद्रभाबेतीरीं चतुर्भुज नरनारी । विठ्ठल कैवारी उभा असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव