भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक एकादशी जरी हो पंढरीसी

ek ekadashi jari ho pandharisi

रचनाकार: संत बंका · अभंग
एक एकादशी जरी हो पंढरीसी । सुकृताच्या राशी ब्रह्मा नेणे ॥१॥ चंद्रभागेतीरीं चतुर्भुजा नरनारीं । तेथें उभा हरि पंढरीराव ॥२॥ परतोनि मागुता ऐसा कईं होसी । जाउनी पंढरीसी पाहे डोळां ॥३॥ तुझे देह गेह ऐसे पैं न म्हण । साधीं हें निधान पांडुरंग ॥४॥ पुनरपि संसारा न येसी मागुता । आणिक सर्वथा ऐसा नाही ॥५॥ वंका म्हणे पहाल भजाल देहीं । तापत्रय गेलें सर्वही पांडुरंगीं ॥६॥