भजनी मालिका
← भजनांकडे परत

युक्तिप्रयुक्तीचें प्रमाण मी नेणें । केशवचरणें ध्यातों मनीं

yuktiprayuktichen praman mi nenen | keshavacharanen dhyaton manin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
युक्तिप्रयुक्तीचें प्रमाण मी नेणें । केशवचरणें ध्यातों मनीं ॥१॥ आणिक साधन काय म्यां करावें । ब्रह्मादिक देव मौन ठेले ॥२॥ आतां मी कायसा करावा आधार । चरण विर्धार देवपूजा ॥३॥ नामा म्हणे तुझा अंत नाहीं पार । काय म्यां पामर जाणों आतां ॥४॥