भजनी मालिका
← भजनांकडे परत

युगांबरोबरी जाताती घटिका । गोकुळींच्या लोकां तैसें झालें

yugambarobari jatati ghatika | gokulinchya lokan taisen jhalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
युगांबरोबरी जाताती घटिका । गोकुळींच्या लोकां तैसें झालें ॥१॥ उदास दिसती वनें दाही दिशा । कायरे जगदीशा आह्मां केलें ॥२॥ वेडावल्या गायी करिताती खंती । वत्स न क-रिती स्तनपान ॥३॥ अन्नपाणी तेव्हां वर्जिती गौळणी । आतां चक्रपाणी कैंचा आह्मां ॥४॥ यमुनेचे तीरीं वृक्ष ते सुकले । पाषाण उलले तया दु:खें ॥५॥ प्रात: काळीं गडी अवघेचि बोलती । मा-रूनि श्रीपति गेला नाही ॥६॥ जीवनाविण मत्स्थ जैसे तळमळती । नामा ह्मणे चित्तीं धन्य प्रेमा ॥७॥