भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनि संसारा । हित वेगीं विचारा

yeuni sansara | hit vegin vichara

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येऊनि संसारा । हित वेगीं विचारा ॥१॥ स्मरा ह्रषिकेशी । तो नेईल परलोकासी ॥२॥ गणिका नाम उच्चारी वाचे । जन्ममरण चुकलें तिचें ॥३॥ अजामेळ पापराशी । नामें पावला मोक्षासी ॥४॥ दूध मागों गेलें लेकरुं । तया दिधला क्षीरसागरु ॥५॥ सापत्नी धुरु दवडिला । तो अढलपदीं बैसविला ॥६॥ गजेंद्र स्मरत तांतडी । त्याची चुकविलीं सांकडीं ॥७॥ नामा म्हणे नामबळें । उद्धरती कोटी कुळें ॥८॥