भजनी मालिका
← भजनांकडे परत

येउनि आळंकावती केला क्षेत्रवास । देऊनी चित्तास समाधान

yeuni alankavati kela kshetravas | deuni chittas samadhan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येउनि आळंकावती केला क्षेत्रवास । देऊनी चित्तास समाधान ॥१॥ नित्य हरिकथा नामसंकीर्तन । संतांचे दरुशन सर्वकाळ ॥२॥ पंढरीची वारी आषाढी कार्तिकी । विठठल येकाकी सुखरुप ॥३॥ ऐसा बहुत काळ क्रमिलियावरी । पुत्र अपत्य उदरीं होतां न दिसे ॥४॥ विठठल म्हणे अवो ऐकतेसी कांते । मज ऐसें वाटतें संन्यास घ्यावा ॥५॥ देसी आज्ञा तरी जाईन वाराणसी । ऐसें रखुमाईसी म्हणितलें ॥६॥