भजनी मालिका
← भजनांकडे परत

येतां जाता थोर कष्टलों गर्भवासीं । पडिलों गा उपवासी प्रेमेंविण

yetan jata thor kashtalon garbhavasin | padilon ga upavasi premenvin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येतां जाता थोर कष्टलों गर्भवासीं । पडिलों गा उपवासी प्रेमेंविण ॥१॥ बहुतांचा सेवका जालोंज काकुळती । न पावें विश्रांती तयाचेनी ॥२॥ ऐसें माझें मन शिणलें नानापरी । घालीन आभारीं संताचिया ॥३॥ वियोगें संतांच्या व्याकुळ चिंतातुर । हिंडें दारोदार दीनरूपें ॥४॥ परि कोणी संतांच्या न घालिती चरणीं । तळमलीं अनुदिनीं अश्रांत सदा ॥५॥ माझें माझें म्हणोनि जया घालीं मिठी । दिसे तेचि दिठीं नाहीं होय ॥६॥ तया शोकानळें संतप्त आंदोळें । गेलें तें न मिळे कदाळाळीं ॥७॥ न देखत ठायीं देखावया धांवें । भ्रांती भुललें भावें नानामार्गीं ॥८॥ तुझा स्वरूपानंदु नाहीं वोळखिला । जाली ते विठ्ठला हानि थोर ॥९॥ लोहाचा कवळु लागला परिसातें । पढिये सर्वांतें होय जेवीं ॥१०॥ नामा म्हणे तैसी भेटी संतचरणीं । करूनि त्रिभुवनीं होईन सरता ॥११॥