भजनी मालिका
← भजनांकडे परत

येरु तो निवांत होउनी त्याठायीं । राहोनियां कांहीं करिता झाला

yeru to nivant houni tyathayin | rahoniyan kanhin karita jhala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येरु तो निवांत होउनी त्याठायीं । राहोनियां कांहीं करिता झाला ॥१॥ न कळे भक्तिभाव घ्यावें कैसें त्यासी । देव कोण त्यासी ठावें नाहीं ॥२॥ भावार्थानें सर्व इंद्रियें खुंटलीं । प्रारब्धानें दिल्ही वाट तया ॥३॥ साध्यसाधनाचा उपाव कळेना । घ्यान तो धारणा कौंचि तेथें ॥४॥ नामा म्हणे गुरु करावा तें नेणे । अद्‌भुत विंदान मांडियेलें ॥५॥