भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईं वो वामने खुजीयखुजटे । पंढरीचे पेठे उभी राहें

yein vo vamane khujiyakhujate | pandhariche pethe ubhi rahen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईं वो वामने खुजीयखुजटे । पंढरीचे पेठे उभी राहें ॥१॥ येईं वो डोळसे सांवळे तेजसे। वामने बहु बसे ब्रह्मचारी ॥२॥ अनंत विद्नदे अनंत अपार । कैवल्य वोसरे पदकमळें ॥३॥ तुझें नाम धन्य वामन साजिरें । रूप हें गोजिरे बळीच्या द्वारी ॥४॥ तुझ्या चरणी तीर्थें उद्धरती सर्व । येई तूं संत्वर वामनाई ॥५॥ नामा ह्मणे पावे वामन ब्रह्मांडे । स्वरूप वितंडे ब्रह्मचारें ॥६॥