भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईं वो तूं कृष्णे हरी माझिये तृष्णे । दिननिशीं प्रष्णे वाट पाहें

yein vo tun krushne hari majhiye trushne | dinanishin prashne vat pahen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईं वो तूं कृष्णे हरी माझिये तृष्णे । दिननिशीं प्रष्णे वाट पाहें ॥१॥ त्राहे कृष्णगंगे सावळे सारंगे । नामस्मरण वेगें पुरे आम्हां ॥२॥ रामकृष्ण टाहो नामें लवलाहो । फिटला संदेहो संसाराचा ॥३॥ उद्धव अक्रूर यादव सादर । कृष्णाते अपार तयालागीं ॥४॥ अर्जून द्रौपदी स्मरण गोविंदी । पावावें निजपदीं नामा म्हणे ॥५॥