भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईं वो केसरी नरसिंह उच्चारी । पवित्र साचारी तिहीं लोकीं

yein vo kesari narasinh uchchari | pavitra sachari tihin lokin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईं वो केसरी नरसिंह उच्चारी । पवित्र साचारी तिहीं लोकीं ॥१॥ नरसिंह वामन प्रल्हाद रक्षण । आमुचें तें धन नाम तुझें ॥२॥ शंखचक्र करीं पावे वो लवकरी । येइम तूं केसरी लवलाहे ॥३॥ नरसिंह हे नाम नरसिंह हें प्रेम । उत्तमोत्तम तिन्ही लोकीं ॥४॥ त्रिपुररक्षक दानवमर्दन । विकटवदन पंचाक्षरी ॥५॥ नामा म्हणे हरि नाम नरकेसरी । नरसिमह उच्चारी तरती जीव ॥६॥