भजनी मालिका
← भजनांकडे परत

यारे नाचों प्रेमानंदें । विठ्ठल नामाचिया छंद्रें

yare nachon premananden | viththal namachiya chhandren

रचनाकार: संत नामदेव · अभंग
यारे नाचों प्रेमानंदें । विठ्ठल नामाचिया छंद्रें ॥१॥ जाऊं ह्मणती पंढरिची वाट । कळिकाळा भय वाटे ॥२॥ चंद्रभागे घडलें स्नान । यमलोकीं पडली हान ॥३॥ झाली पुंडलिका भेटी । पूर्वज आनंदले वैकुंठीं ॥४॥ आतां राउळासी जातां । झाली जी-वाचि मुक्तता ॥५॥ विष्णुदास नामा म्हणे । आतां नाहीं येणें जाणें ॥६॥