भजनी मालिका
← भजनांकडे परत

यज्ञादिक कर्म करूनि ब्राह्मण । दंभ आचरण दावी लोकां

yadnyadik karma karuni brahman | dambh acharan davi lokan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
यज्ञादिक कर्म करूनि ब्राह्मण । दंभ आचरण दावी लोकां ॥१॥ लोकांसी दाविती मीच कर्मनिष्थ । अभिमान खोटा वागविती ॥२॥ वागविती वाक्य जाण ऋषेश्वर । नको येरझार नामामतें ॥३॥ नानामतें अधोऊर्ध्वसात जावीं । नको गोवागोवीं नामा ह्मणे ॥४॥