भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यापकं तें नाम तेव्हांच होईल । जेव्हां ओळखेल मीपणासी

vyapakan ten nam tevhanch hoil | jevhan olakhel mipanasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
व्यापकं तें नाम तेव्हांच होईल । जेव्हां ओळखेल मीपणासी ॥१॥ आपुलेंचि नाम न ओळखिलें । व्यापक साधिलें जायेचिना ॥२॥ आपुलीच ओळख आपणासी पडे । मग सर्वत्र जोडे नाम तेव्हां ॥३॥ नामाविण नाम तेंचि होय विभ्रम । नामदेव म्हणे संताम पुसा ॥४॥