भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्रत तप दान हवन पूजन । न लगे साधन नाम म्हणतां

vrat tap dan havan pujan | na lage sadhan nam mhanatan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
व्रत तप दान हवन पूजन । न लगे साधन नाम म्हणतां ॥१॥ रामकृष्ण हरी मुकुंड मुरारी । जिव्हे क्षणभरी न विसंबें ॥२॥ कळिकाळ दारुण करीतसे विघ्न । परजी नारायण नाम जिव्हें ॥३॥ शरण आलों जिव्हे तुवां नुपेक्षावें । नामा म्हणे गावों हरिनाम ॥४॥