भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल नामाची नाहीं गोडी । काळ हाणोनि तोंड फोडी

viththal namachi nahin godi | kal hanoni tond phodi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठ्ठल नामाची नाहीं गोडी । काळ हाणोनि तोंड फोडी ॥१॥ गळां बांधोनि खांबासी । विंचू लाविती जिव्हेसी ॥२॥ ऐसा अभिमानी मेला । नर्ककुंडीं थारा त्याला ॥३॥ नामा बोध करी मना । दासी जनी लागे चरणा ॥४॥