भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठोबारायाच्या अगा लेकवळा । जाउनी कळवळा सांगा माझा

vithobarayachya aga lekavala | jauni kalavala sanga majha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठोबारायाच्या अगा लेकवळा । जाउनी कळवळा सांगा माझा ॥१॥ विठोबारायाच्या अगा मुख्य प्राणा । भेटवीं निधाना आपुलिया ॥२॥ अगे क्षेत्र माये सखे पंढरिये । मोकलीते पाय जीव जातो ॥३॥ विश्वाचिये माते सुखाचे अमृत । सखा पंढरिनाथ विनवी तरी ॥४॥ तूं मायबहिणी देवाचे रुक्मिणी । धरोनियां जनी घालीं पायीं ॥५॥