भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठोबाच्या गांबा जाईन धांवोनी । घालीन लोळणी चरणांवरी

vithobachya gamba jain dhanvoni | ghalin lolani charananvari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठोबाच्या गांबा जाईन धांवोनी । घालीन लोळणी चरणांवरी ॥१॥ शिणभाग द्रवाळिला म्हणेल । जीविंचें पुसेल जड-भारी ॥२॥ हरुषें लोळत जाईन महाद्वारां । भेटाया सामोरा येईल मज ॥३॥ उचलोनी सीस पुसील आदरें । मुख पीतांबरें पुसिल माझें ॥४॥ धरोनि हनुवटी हनुवटी उठवील हस्तकीं । ठेवीन मस्तकीं अभयकर ॥५॥ राई रखुमाई माता सत्यभामा । कडे घेऊनि नामा स्तनीं लावी ॥६॥