भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती । अखंड श्रीपती हेचि द्यावे

vithobache pay raho akhand chitti | akhand shripati hechi dyave

रचनाकार: संत सावता · अभंग
विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती । अखंड श्रीपती हेचि द्यावे ॥१॥ ध्यानीं मनीं वनीं असता सर्व काळ । साधी काळ वेळ याचि परी ॥२॥ नाम हे तारक साचार जीवाचे । सावता म्हणे वाचे सदा घेई ॥३॥