भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी

kanda mula bhaji | avaghi vithabai majhi

रचनाकार: संत सावता · अभंग
कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥ १ ॥ लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ॥ २ ॥ मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥ ३ ॥ सावता म्हणे केला मळा । विठ्ठल पायीं गोंविला गळा ॥ ४ ॥