भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगीं तारक एक नाम । उत्तम धाम पंढरी

jagin tarak ek nam | uttam dham pandhari

रचनाकार: संत सावता · अभंग
जगीं तारक एक नाम । उत्तम धाम पंढरी ॥१॥ चला जाऊ तया गावा। पाहू देवा विठ्ठला ॥२॥ वंदु संत चरण रज । तेणे काज आमुचे ॥३॥ सांवता म्हणे विटेवरी उभा सम चरणी हरी ॥४॥