भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुची माळियाची जात । शेत लावूं बागाईत

amuchi maliyachi jat | shet lavun bagait

रचनाकार: संत सावता · अभंग
आमुची माळियाची जात । शेत लावूं बागाईत ॥ १ ॥ आह्मा हातीं मोट नाडा । पाणी जातें फुलवाडा ॥ २ ॥ शांति शेवंती फुलली । प्रेम जाई जुई व्याली ॥ ३ ॥ सावतानें केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ॥ ४ ॥