भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठोबाचे पाय जन्मोनि जोडावे । संबंधी तोडावे कामक्रोध

vithobache pay janmoni jodave | sambandhi todave kamakrodh

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठोबाचे पाय जन्मोनि जोडावे । संबंधी तोडावे कामक्रोध ॥१॥ ऐक्य सुख घ्यावें एकविध भावें । प्रेम न संडावें आवडीचें ॥२॥ अनंत जन्मा यावें ऐसें भाग्य व्हावें । एक वेळाम जावें पंढरीसी ॥३॥ वृत्तिसहित मन पायींच ठेवावें । अद्वैत भोगावें प्रेमसुख ॥४॥ देहीं देहभाव प्रकृति दंडावें । सांडणें सांडावें ओवाळुनी ॥५॥ नामा म्हणे ऐसें घेतलें माझ्या जिवें । विठोबा पुरवावें आर्त माझें ॥६॥