भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठोबा चला मंदिरात । गस्त हिंडती बाजारांत

vithoba chala mandirat | gasta hindati bajarant

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठोबा चला मंदिरात । गस्त हिंडती बाजारांत ॥१॥ रांगोळी घातली गुलालाची । शेज म्यां केली पुष्पांची ॥२॥ समया जळती अर्ध रात्नीं । गळ्यांमध्यें माळ मोत्यांची ॥३॥ नामदेवाला सांपडलें माणिक । घेतलें जनीनें हातांत ॥४॥ घेउनी गेली राउळांत । गस्त हिंडती हकिमाची बाजारांत ॥५॥