भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठठलासी पाहे विठठलासी ध्याये । विठ्ठलासी गाये सर्वकाळ

vithathalasi pahe vithathalasi dhyaye | viththalasi gaye sarvakal

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठठलासी पाहे विठठलासी ध्याये । विठ्ठलासी गाये सर्वकाळ ॥१॥ विठठल हा वृत्ति विठठल जपणें । चित्त वित्त मनें सर्वकाळ ॥२॥ सबाह्य विठठल दाटे घनवट । दशदिशा अफाट विठ्ठलचि ॥३॥ नामा म्हणे तुम्ही विठठल होऊन । अभंग भजन करीतसां ॥४॥