भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठाई सांवळे डोळसे रंगा येईं हो ॥ध्रु

vithai sanvale dolase ranga yein ho ||dhru

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठाई सांवळे डोळसे रंगा येईं हो ॥ध्रु०॥ कानीं कुंडलांची प्रभा । जैसे चंद्रसूर्य नभा हो ॥२॥ गळां वैजयंती माळा । कासे पीतांबर पिवळा हो ॥३॥ नाम म्हणे कृपावंता । झडकरी यावें पंढरिनाथा हो ॥४॥