भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषयाचा आंदण दिसे केविलवाणा । करीतसे कल्पना नानाविध

vishayacha andan dise kevilavana | karitase kalpana nanavidh

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विषयाचा आंदण दिसे केविलवाणा । करीतसे कल्पना नानाविध ॥१॥ कुटुंब पाईकं ह्मणवी हरिचा दास । मागे ग्रासोग्रास दारोदारीं ॥२॥ जळो त्याचें कर्म जळो त्याचा धर्म । जळो तो आश्रम जाणीवेचा ॥३॥ कल्पद्रुमातळीं काखे घेऊनि-झोळी । बैसोनि सांभाळी भिक्षा अन्न ॥४॥ अधम पोटभरी विचार तो न करी । पुढती दारोदारी हिंडो जाय ॥५॥ पोटालागीं करी नाना विटंबना । संतोषवी मना दुर्जनांच्या ॥६॥ न करी हरीचें ध्यान बैसोनि एकांतीं । जन्माची विश्रांति जेणें होय ॥७॥ द्रव्याच्या अभिलाषें जागे सटवीपाशीं । नवजे एकादशी जागरणा ॥८॥ उत्तम मध्यम अधम न बिचारी । स्तुति नाना करी आशाबद्ध ॥९॥ वैराग्याची वार्ता कैची दैवहता । नुपजे सर्वथा प्रेमभाव ॥१०॥ नामा ह्मणे ऐसें तारी एक्या गुणें । अजा आरोहण गजस्कंधीं ॥११॥