भजनी मालिका
← भजनांकडे परत

विचारूनि पाहा पंढरिचें पाडें । सुख होय थोडें क्षी-रसिंधू

vicharuni paha pandharichen paden | sukh hoy thoden kshi-rasindhu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विचारूनि पाहा पंढरिचें पाडें । सुख होय थोडें क्षी-रसिंधू ॥१॥ सांडूनि वैकुंठ आले जगजेठी । वस्ती वाळवंटीं केली जाण ॥२॥ भक्त सहाकारी ब्रीदें बडिवार । सेवा सुखसार पांडुरंग ॥३॥ जीवींचे सोयरे न मिळे वैकुंठीं । हरिदासा भेटी आडलिया ॥४॥ प्रीतीचे वोरस उभा मागें पुढें । जीवासी आवडे भक्त राणा ॥५॥ लक्ष्मीचा विलासी न वाटे विश्रांती । आवडे श्रीपति भक्तभावा ॥६॥ सगें सर्वकाळ धांवे पाटो वाटी । घाली कृपादृष्टी तयावरी ॥७॥ अमृत सुरस नव्हेति पैं गोडी । ह्मणोनि आवडी कालयाची ॥८॥ ह-रुषें निर्भर सुरवरा खेळे । वाळवंटी लोळे संतसंगेम ॥९॥ अठ्ठावीस युगें उभा विटेवरी । भक्तप्रीय हरि स्वामि माझा ॥१०॥ नामा ह्मणे त्याचे सुखरूप पाय । क्षणेक न होय जीवाहुनी ॥११॥