भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्हावें कथेसी सादर । मन करूनियां स्थीर

vhaven kathesi sadar | man karuniyan sthir

रचनाकार: संत नामदेव · अभंग
व्हावें कथेसी सादर । मन करूनियां स्थीर ॥१॥ बाबा काय झोंपी जातां । झोले चौर्‍यांशींचे खाता ॥२॥ नरदेह कैसारे मागुता । भेटी नव्हे त्या सीताकांता ॥३॥ आळस निद्रा उटाउठी । त्यजा स्वरूपीं घाला मिठी ॥४॥ जनी म्हणे हरिचें नाम । मुखीं म्हणा धरुनि प्रेम ॥५॥