भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेडिया उपचार गाढवा गुर्‍हाळ । ह्मैसिया बिर्‍हाड पुष्पवनीं

vediya upachar gadhava gur‍hal | hmaisiya bir‍had pushpavanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वेडिया उपचार गाढवा गुर्‍हाळ । ह्मैसिया बिर्‍हाड पुष्पवनीं ॥१॥ पद्मासनीं केंवि कुंजर हा बैसे । कोडिया न दिसे चंदन बरवा ॥२॥ तैसा नव्हे देव मूर्ख जनांच्या भक्ति । भल्याचा विरक्ति ज्ञानवांटा ॥३॥ शेळीस ऊंस कळकटीया सुदिवस । सूकराप्रित रस आंबियाचा ॥४॥ दर्दुरा क्षीरपान त्रिदोषिया मौन । मद्यपिया मन स्थिर नव्हे ॥५॥ नामा ह्मणे हरि सबाह्य भरला । भरोनि उरला दाही दिशा ॥६॥