भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदपरायण मनीं तो ब्राम्हण । चित्त समाधान संतुष्ट सदा

vedaparayan manin to bramhan | chitta samadhan santushta sada

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वेदपरायण मनीं तो ब्राम्हण । चित्त समाधान संतुष्ट सदा ॥१॥ येरा माझें नमन सर्वसाधारण । ग्रंथाचें राखण म्हणोनियां ॥२॥ शास्त्रपंडित तोचि मी बहुमानी । जो आपणातेम जाणोनि तन्मय जाला ॥३॥ पुराणिक ऐसा मानितो कृतार्थ । विषयीं विरक्त विधीपाळी ॥४॥ मानीं तो हरिदास ज्या नामीं विश्वास । मी त्याचा दास देहभावें ॥५॥ नामा म्हणे ऐसें कईं भेटविसी विठ्ठला । त्यालागीं फुटला प्राण माझा ॥६॥